खर्डीतील ३०० अनधिकृत बांधकामे भुईसपाट होणार

सामना ऑनसलाईन । खर्डी

शासकीय भूखंड आंदण मिळाल्याप्रमाणे त्यावर कब्जा मिळवण्यासाठी राडे करणाऱ्या भूमाफियांचे कंबरडे मोडण्याची तयारी तहसील विभागाने सुरू केली आहे. येथील अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेल्या घरपट्टी रद्द करण्याचे व नवीन घरपट्टी न लावण्याचे लेखी आदेश तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला दिले आहेत. तसेच ही सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भूमाफियांचे ढाबे दणाणले आहेत.

शहापूर महसूल विभागातर्फे खर्डीतील १०६ कुटुंबांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा २०१६ ला बजावण्यात आल्या होत्या. परंतु महसूल विभाग व ग्रामपंचयात यांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन वर्षांत शासकीय जागेत २०० च्या वर घरांचे अतिक्रमण झाले असून हे अतिक्रमण हटविण्याची मागणी खर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच भाग्यश्री डिगे व संघर्ष पॅनलचे अध्यक्ष उपेंद्र सोनार यांनी शहापूरचे तहसीलदार रविंद्र बाविस्कर यांच्याकडे केली. तसेच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी शासकीय जागेवर असलेले सर्व अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेल्या घरपट्ट्य़ा रद्द करण्याचे व घरपट्टी लावू नये, असे लेखी आदेश ग्रामपंचयतीला देण्यात आले असून अतिक्रमण हटविण्याची सर्व तयारी सुरू असून लवकरच कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार रविंद्र बाविस्कर यांनी सांगितले.

भूमाफियांचे राडे
शासकीय जागा बळकावण्यासाठी भूमाफियांचे येथे रोजच राडे होत आहेत. गेल्या सात दिवसांत पोलीस ठाण्यात हाणामारीच्या तीन घटनांची नोंद झाली असून जमिनीच्या वादात एखाद्याचा बळी जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

अतिक्रमणाच्या नोटिसा महसूल किभागाच्या आदेशाने बजाकण्यात आल्या असून यासंदर्भात मासिक सभेत ठराक घेण्यात आला आहे. अनधिकृत घरांच्या घरपट्टय़ा बंद करण्यात आल्या आहेत. पोलीस बंदोबस्त क तहसीलदारांची केळ उपलब्ध झाल्याकर तत्काळ अतिक्रमणे काढण्यात येतील.

-भाग्यश्री डिगे, सरपंच, खर्डी ग्रामपंचायत.