ठाण्यात ४ अनधिकृत टेलिफोन एक्सेंजचा पर्दाफाश, पाच अटकेत

2

सामना प्रतिनिधी । ठाणे

भिवंडीमध्ये सुरू असलेल्या ४ अनधिकृत टेलिफोन एक्सेंजवर ठाणे पोलीस गुन्हे शाखेनं छापा टाकला आहे. सर्व सरकारी यंत्रणांना अंधारात ठेवून ठाण्यात चोरीछुपे अनधिकृत टेलिफोन एक्सेंज सुरू करण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १७ लाख ५४ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पोलीस यंत्रणेला खबर न लागू देता आरोपींनी इंटरनॅशनल कॉल करण्याची यंत्रणा उभी केली होती. अनधिकृत टेलिफोन एक्सेंजमुळं सरकारचा ३० कोटी रुपयांचा महसूल बुडाला असे ठाणे पोलिसांनी सांगितले. सुरक्षा यंत्रणांना शोध घेता येऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय कॉल व्हीओआयपीद्वारे कॉल प्राप्त केले जात होते असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. तसेच या टेलिफोन एक्सेंजचा वापर इतर कोणत्या कारणांसाठी करण्यात येत होता याचा पोलीस शोध घेत आहेत.