वर्ल्डकपची रणधुमाळी सुरू

सामना ऑनलाईन, मुंबई

प्रथमच हिंदुस्थानच्या यजमानपदाखाली खेळवण्यात येत असलेल्या फिफा अंडर-१७ विश्वचषक स्पर्धेची सलामी नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर फुटबॉल शौकिनांच्या तुफान उपस्थितीत रंगली. पहिल्या लढतीत न्यूझीलंड-तुर्की यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली, तर दुसऱया रोमहर्षक लढतीत पॅराग्वेने माजी उपविजेत्या माली संघावर ३-२ असा चुरशीचा विजय मिळवला.

मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल संघटनेचे (एमडीएफए) अध्यक्ष, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी नवी मुंबईतील विश्वचषक लढतींचा आनंद घेतला. याप्रसंगी त्यांच्यासोबत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील हेही व्हीआयपी कक्षात उपस्थित होते.