भयंकर! पोलिसावर कुदळीने जीवघेणा हल्ला करीत कैदी फरार

7


सामना ऑनलाईन, भिंड

मध्य प्रदेशातील भिंडमधला एक भयंकर प्रकार सीसीटीव्हीमुळे समोर आला आहे. एका कैद्याने कुदळीने वार करीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणार हल्ला केला आहे. यातील एक कर्मचारी गंभीर असून त्याला उपचारासाठी दिल्लीला हलविण्यात आले आहे. दुसऱ्या कर्मचाऱ्यावर भिंडमध्येच उपचार सुरू आहे.

पांढऱ्या रंगाची हाफ पँट आणि काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला हा कैदी पाठून येतो आणि दोन्ही कर्मचाऱ्यांवर कुदळीने वार करतो असं या सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसतंय. पहिल्या कर्मचाऱ्यावर वार करताच तो जमिनीवर कोसळतो आणि मोबाईलवर बोलत असलेला दुसरा कर्मचारी दोन वार झाल्यानंतर कोसळतो असं या दृश्यांमध्ये दिसतंय. वार केल्यानंतर हा कैदी पळून गेला आहे. त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या