मॅक्सिकोत सापडले जगातील सर्वात मोठे पाण्याखालचे भुयार

सामना ऑनलाईन। लिओन

मॅक्सिकोतील युकाटन बेटाच्या सुमद्राखाली पाणबुड्यांना मोठे व अतिप्राचीन भुयार सापडले आहे. ३४७ किलोमीटर लांब असलेले हे भुयार १२ हजार वर्षापूर्वीचे आहे. या भुयारात कबर व मानवी सांगाडे सापडले आहेत. या भुयारात अनेक प्राचीन रहस्य दडल्याचा दावा येथील पुरातन खात्याने केला आहे. सॅक एक्टन असे या भुयाराला नाव देण्यात आले आहे.

mexico-tunnel-4

मॅक्सिकोच्या आग्नेय दिशेला युकाटन हे बेट असून येथे प्राचीन रहस्यांचा खजिना दडल्याचे बोलले जाते. याचपार्श्वभूमीवर या बेटावर ग्रैन अक्युफेरो माया (जीएएम) हे अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत संशोधक व पाणबुड्यांची एक टीम खोल पाण्याखाली गेली असता त्यांना हे भुयार सापडले.

mexico-tunnel-5

समुद्राच्या पोटात दडलेले हे भुयार पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण पाण्याच्या तळाशी त्तत्कालिन राजे रजवाडे आपल्या मौल्यवान वस्तू पुरुन ठेवत. यामुळे पाण्याखाली तसाच काही ऐतिहासिक ऐवज असावा असा संशोधकांचा व पाणबुड्यांचा अंदाज होता. पण भुयारांत मानवी सांगाडे, प्राचीन धातुंची भांडी, यांबरोबरच विविध वस्तू सापडल्या आहेत. ज्या एके काळी पाण्याखाली मानवी वस्ती असल्याचे संकेत देत आहेत. याचा संबंध माया सभ्येतेशी असावा अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली असून यातून प्राचीन इतिहास मिळवण्यासाठी संशोधक अभ्यास करत आहेत.mexico-tunnel-2