मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर गोंधळ, तरुणाची आत्महत्येची धमकी

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्राचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर उभे राहून एका तरुणाने आत्महत्येची धमकी दिली. जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा कृषीमंत्री मला भेटत नाहीत, माझ्याशी बोलत नाहीत, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असे त्याने जाहीर केले.

पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तरुण पोलिसांना दाद देत नव्हता. उडी मारलीच तर तरुणाला झेलण्यासाठी अग्निशमन दलाने आवश्यक ती तयारी केली होती. दरम्यान, दीपक केसरकर यांनी बोलत-बोलत तरुणाला पकडले आणि आतमध्ये ओढून घेतले. त्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण शेतकरीच!

आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातला सदस्य आहे. आनंद साळवे असे त्याचे नाव आहे. सोयाबीन आणि कापसाचे भाव पडल्यामुळे आनंद साळवे यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला होता.