नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती शुक्रवारी अचानक बिघडली. आसाम येथे माजुली बेट या ठिकाणी आयोजित एका सभेत बोलत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

गडकरी यांची तब्येत बिघडल्याचे लक्षात येताच आयोजकांनी तत्काळ डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी सभास्थळीच गडकरी यांच्यावर प्राथमिक उपचार केले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे गडकरी यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.

नितीन गडकरी यांना सलग तासभर भाषण केल्यानंतर रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास झाला होता. वेळेवर उपचार केल्यामुळे आता त्यांची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गडकरी यांच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नाही, असे जिल्हा वैद्यकीय अधिकारी शशिधर फुका यांनी सांगितले.