Lok sabha 2019 : 50 वर्षांत प्रथमच ‘हा’ नेता निवडणूक लढणार नाही

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेते निवडणूक लढताना दिसणार नाहीत. काहींनी वैयक्तीक कारणांचा हवाला देत माघार घेतली आहे, तर काहींनी पक्षामध्ये तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहेत. हे दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी प्रचारामध्ये मात्र आपल्या बुलुंद तोफांनी मैदान गाजवताना दिसतील. शरद पवार, सुषमा स्वराज, उमा भारती यांच्यासह रामविलास पासवान हे देखील निवडणूक लढवणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

Lok sabha 2019 देशाचे चार दिग्गज नेते यंदा लोकसभेच्या रिंगणात नसणार!
Lok sabha 2019 माजी मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री निवडणूक लढणारही नाही व प्रचारातही नाहीत

1969 मध्ये प्रथमच आमदारपद आणि 1977 पासून खासदार म्हणून सतत 8 वेळा लोकसभेचे तर एकदा राज्यसभेचे खासदारपद भूषविणारे बिहारच्या लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख रामविलास पासवान यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. सुमारे 50 वर्षे निवडणूक रिंगण गाजविणाऱ्या पासवान यांनी आता विश्रांती घ्यायचे ठरवले आहे. रामविलास पासवान यांनी संयुक्त लोकशाही आघाडी (युपीए )आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) या दोन्ही राजवटींत मंत्रीपदे भूषवली आहेत.

ram-vilas-paswan-modi

बिहारमध्ये रामविलास पासवान यांचा लोजपा पक्ष 40 पैकी 6 जागांवर निवडणूक लढणार आहेत. परंतु हाजीपूरमधून कोण लढणार याबाबत संभ्रम आहे. लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे सांगत पासवान म्हणाले की, ‘हाजीपूर लोकसभा मतदार संघातून माझ्या जागी कोण लढेल याबाबत पक्ष निर्णय घेईल. चिराग पासवान जमुईमधून निवडणूक लढणार आहे, तर पत्नीने निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. तर भाऊ पशुपती पासवान बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत, त्यामुळे हाजीपूरमधून कोण लढणार याबाब पक्ष निर्णय घेईल.’

election-commission-logo

दरम्यान, लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असून 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने यंदा विविध धर्मांच्या सणांवर लक्ष ठेऊन वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा 90 कोटी लोक मतदान करणार असून यात नवमतदारांची संख्या जास्त आहे. जवळपास दीड कोटी नवमतदार यंदा आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसतील. देशभरात एकून 10 लाख मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.