मोदींची शिष्टाई निष्फळ; तेलगू देसम मंत्रिमंडळातून बाहेर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तेलगू देसमच्या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान व तंत्रज्ञान राज्य मंत्री वाय.एस. चौधरी यांनी आपला राजीनमा पंतप्रधानांकडे सूपूर्त केला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी अमान्य केल्यानंतर या मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश तेलगू देसम प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी दिले होते.

मोदींची शिष्टाई असफल

चंद्राबाबू नायडू यांचे मन वळवण्यासाठी गुरुवारी दिवसभर भाजपकडून जोरदार हलचाली सुरु होत्या. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांच्याशी वीस मिनिटे फोनवर बातचित केली. ‘मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय कळवण्यासाठी मी मोदींना फोन केला होता, पण हा फोन मोदींनी घेतला नाही’, असा आरोप नायडूंनी गुरुवारी केला होता. त्यानंतर मोदींनी आज धावपळ करत नायडूंना फोन केला. मोदींनी फोनवरुन नायडूंचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती सूत्रांनी दिली, पण त्यांचा हा प्रयत्न अखेर अपयशी ठरलाय.

तेलगू देशम पक्ष आणि भाजपात नेमकं कशावरून बिनसले, वाचा सविस्तर..