‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार


सामना ऑनलाईन। बीजापूर

आपण कायम तरुण दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. अनेकजण त्यासाठी वेगवेगळे प्रयोगही करतात. ज्यामुळे ते चाळीशीतही पंचवीशीतले दिसू लागतात. पण छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यापासून 60 किमी अंतरावरील भोपालपट्टनम येथील गेरागुडा हे  एक असं गाव आहे जिथे 25 वर्षात तारुण्य संपत व व्यक्ती वयस्क दिसू लागतात. 40 वर्षापर्यंत येथील नागरिक काठीचा आधार घेऊन चालतात.

त्यांच्या या वेळेच्या आधी वृद्ध होण्याचं कारण येथील पाणी आहे. कारण या पाण्यात फ्लोराईडचं प्रमाण अधिक असल्याने संपूर्ण गावचं वेळेच्या आधी वार्धक्याकडे झुकतयं. या गावात पाण्याची दुसरी सोयच नसल्याने नागरिकांना विहीरीत व तळ्यात साचलेले फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागतं आहे. अकाली वृद्धत्व येत असल्याने येथे ऐन विशी व पंचविशीतले तरुण कमरेतून वाकले आहेत. यामुळे या गावात नवीन पाण्याची योजना करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. गेल्या तीस वर्षात तरुणांमध्ये वृद्धत्व येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे येथील तरुणांना नोकरी मिळणेही कठिण झाले आहे.