जायकवाडीच्या कालव्यात सापडला मृतदेह, खून झाल्याचा संशय

1
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । परभणी

जायकवाडी कालव्याच्या पाण्यात अज्ञात व्यक्तीचे प्रेत वाहून आल्यामुळे नांदगाव, राहटी पसिरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यत आज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रेत खाकी रंगाच्या पोत्यामध्ये आढळून आले आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर चाकुने अनेक वार करण्यात आले आहेत. प्रेताची ओळख अद्याप पटू शकली नाही.

अज्ञात व्यक्तीने खून करुन प्रेत पोत्यात भरून कालव्याच्या पाण्यात टाकले असावे, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. याप्रकरणी आज अज्ञातांविरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.