आता एक रुपयात अनलिमिटेड डेटा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

स्मार्टफोन आणि टॅब्लेट बनवणाऱया डेटाविंड कंपनीने बीएसएनएलशी करार केला आहे. यामध्ये युजर्सला एक रुपयात एका दिवसासाठी अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. याचा अर्थ फक्त ३० रुपये खर्चून महिन्याला अनलिमिटेड इंटरनेट डेटाचा लाभ घेता येईल.

डेटाविंडचे प्रमुख सुनीतसिंह तुली यांनी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात ही सेवा सुरू होईल अशी माहिती दिली. त्यासाठी कंपनीचे पेटेंट ऍप मेरानेटचा वापर केला जाईल. नवीन तंत्रज्ञानावर आधारित ऍप आहे. इंटरनेटवर येणाऱया फायलींना कॉप्रेस करून लहान केल्या जातात आणि त्यांच्या गुणवत्तेवरही काहीच परिणाम होत नाही.

बीएसएनएल युजर्सला डेटाविंड कंपनीचे मेरानेट ऍप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. ऍपमुळे ग्राहकांचा डेटा वापरला जाणार नाही, त्याऐवजी मेरानेटचा डेटा वापरला जाईल.