पराभवासाठी मी स्वत: जबाबदार! राज बब्बर पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत

सामना ऑनलाईन । लखनौ

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पुन्हा पानिपत झाले आहे. काँग्रसला जेमतेम एका जागेवर यश मिळाले आहे. खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे त्यांचा अमेठीमधील पराभव रोखू शकले नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेले खासदार राज बब्बर यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देण्याचे संकेत ट्विटरवरून दिले आहेत.

राज बब्बर यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, ” जनतेचा विश्वास संपादन केल्याबद्दल विजयी उमेदवारांचे अभिनंदन उत्तर प्रदेश काँग्रेससाठी हे निकाल निराशाजनक आहेत. माझी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडू शकलो नाही, यासाठी मी स्वत:ला जबाबदार मानतो. याबाबत पक्षश्रेष्ठींना भेटून माझे म्हणणे मांडेन” असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या