तुझ्यात जीव रंगला… ड्रेस पीसवरून दोन महिलांमध्ये चप्पल वॉर

366

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे दोन महिलांमध्ये कपडे खरेदीवरून मोठा राडा झाल्याने दुकानदारांना दुकानंच बंद करावी लागल्याची अजब घटना घडली आहे. एकमेकींच्या जीवावर उठलेल्या या दोघींना दुकानदारांनी कसेबसे शांत केल्यानं अखेर वातावरण निवळलं.

बिजनौर मधील नजीबाबाद येथे मोठा कपडा बाजार आहे. सोमवारी येथील एका दुकानात महिला कपडे खरेदीसाठी आल्या होत्या. त्यातील एका महिलेला एक ड्रेस पीस खूपच आवडला त्यामुळे तिने तो बाजूला ठेवण्यास दुकानदाराला सांगितले. त्याचवेळी दुसऱ्या एका महिलेचे लक्ष त्या पीसकडे गेले. 0तिलाही तो आवडला त्यामुळे तिने तो उचलला व दुकानदाराला त्याची किंमत विचारली. आपल्याला आवडलेला ड्रेस पीस दुसऱ्या महिलेच्या हातात असल्याचे बघून पहिल्या महिलेची सटकली. तिने तो पीस दुसरीच्या हातातून खेचून घेतला व तो मी घेणार असल्याचे तिला सांगितले. याप्रकारामुळे अहंभाव दुखावल्याने दुसरीने तो ड्रेस पीस मीच विकत घेणार असे सांगत पहिल्या महिलेला धक्काबुक्की केली.

women-fight

बघता बघता दोघींमध्ये ड्रेस पीसवरून इतका वाद झाला की त्यांनी एकमेकींच्या झिंज्या खेचण्यास सुरुवात केली. हे पण कमी म्हणून नंतर त्या दोघीं एकमेकींच्या छाताडावर बसून ठोसे लगावू लागल्या. महिलांची ही मारहाण बघण्यास लोकांनी एकच गर्दी केली. यात दुकानाच्या काचा फुटल्या. अनेकजण त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. अखेर दुकानात सुरू झालेली ही मारहाण रस्त्यावर पोहचली. दोघी रस्त्यावर उतरल्या. त्यामुळे भांडण करत करत त्या आपल्या दुकानात शिरतील अशी भीती इतर दुकानदारांना वाटू लागली. त्यामुळे त्यांनी दुकानंच बंद केली. तासभर दोघी एकमेकींना कधी फाईट मारत होत्या तर कधी चपलांनी धूत होत्या. अखेर दुकानदारांनी मध्यस्ती करून त्यांना समजावले व भांडण न करण्यास सांगितले. थोडावेळाने त्या दोघी शांत झाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या