रत्नागिरी जिल्ह्यातील २१९ ग्रामपंचायतींमध्ये रविवारी निवडणार उपसरपंच

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

थेट सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली आहे़. रत्नागिरी जिल्ह्यातील २१९ ग्रामपंचायतींमध्ये रविवार १२ नोव्हेंबर रोजी उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे़.

ग्रामपंचायत निवडणूकीत यंदा थेट सरंपच निवडण्यात आला़. थेट सरपंचपदामुळे निवडणूकीत एक चुरस निर्माण झाली होती़. सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर आता उपसरपंचपदाच्या निवडणुका होत आहेत़. १२ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सदस्य उपसरपंचाची निवड कंरणार आहेत़. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये २२२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुक प्रक्रिया पार पडली़. त्यामध्ये चिपळूणमधील २ आणि संगमेश्वरमधील एका ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदाची निवडणुक पुढे ढकलण्यात आली आहे़. त्यामुळे जिल्ह्यात २१९ ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच निवडला जाणार आहे़.