भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘बबन’ चा टीझर प्रदर्शित

83

सामना ऑनलाईन । मुंबई

‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा आगामी मराठी चित्रपट ‘बबन’ चा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्राक्षा फिल्म्स प्रस्तुत ‘बबन’ चित्रपटाची निर्मिती विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, भाऊसाहेब शिंदे आणि मोनाली संदीप फंड यांनी केली आहे.

भाऊराव कऱ्हाडे या सामान्य शेतकरी कुटुंबातील दिग्दर्शकाने चित्रपट बनवण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपली शेतजमीन विकून पैसे उभे केले. म्हणून सर्वत्र त्यांचं प्रचंड कौतुक झालं. आता त्यांच्या आगामी ‘बबन’ चित्रपटाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

पाहा बबनचा टीझर-

आपली प्रतिक्रिया द्या