‘उरी’स्टार विक्की कौशलशी ब्रेकअपनंतर अभिनेत्रीची भावूक पोस्ट

2

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘उरी’ चित्रपटामधील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री हरलीन सेठी यांच्यात ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. हरलीन सेठी आणि विक्की कौशल हे एक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी प्रत्यक्षपणे याला दुजोरा दिला नसला तरी अनेक ठिकाणी दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. आता दोघांमध्ये ब्रेकअपचे वृत्त असून हरलीनने आपले दु:ख सोशल मीडियावर कवितेद्वारे व्यक्त केले आहे. तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

लँबरगिनी गाण्यामुळे (Lamborghini Song) चर्चेत आलेली हरलीन आणि विक्की कोशल यांच्यात गेल्या काही काळापासून गुटरगू सुरू होते. दोघेही आपल्या रिलेशनशिपबाबत व्यक्त झाले नसले तरी दोघांच्या डेटवर जाण्याच्या चर्चा बॉलिवूड वर्तुळामध्ये रंगत होत्या. परंतु नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये विक्की कौशलने असे वक्तव्य केले की दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला. विक्की कौशलने आपण सध्या सिंगल असल्याचे म्हटल्याने हरलीनसोबत सुरू असलेले गुटरगू बंद झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याच दरम्यान हरलीनने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आणि या चर्चांना जणू मूक संमतीच मिळाली.

हरलीनने एक कविता शेअर करत आपले दु:ख व्यक्त केले आहे. यात तिने आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. कुठून सुरू केले होते आणि कुठे आले असे बोल या कवितेचे आहेत. इंग्रजीमध्ये असलेल्या या कवितेतील अनेक शब्द वाचणाऱ्याच्या काळजाला हात घालणारे आहेत.