कोठारेंच्या घरी आली नन्ही परी


सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. उर्मिलाचा पती आणि अभिनेता आदिनाथ कोठारेने It’s a Girl !!!!! म्हणत इंस्टाग्रामवर ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कोठारेंच्या घरी छोट्या परीचं आगमन झाल्याची बातमी समजल्यावर सगळ्यांनीच त्यांचं अभिनंदन केलं आहे.

काही महिन्यांपूर्वी उर्मिलाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला होता. तसेच उर्मिलाने तिच्या बेबी शॉवरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. उर्मिला गरोदर असताना आपल्या आयुष्यातील हे खास क्षण एन्जॉय करण्यासाठी आदिनाथसोबत बेबीमूनला गेली होती. मध्यप्रदेशमधील पेंचच्या अभयारण्यात हे दोघेही बेबीमूनसाठी गेले होते.