Video- काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, उर्मिला मातोंडकर यांची पोलिसांत तक्रार

21

सामना ऑनलाईन । मुंबई

बोरिवली रेल्वेस्थानक परिसरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. काँग्रसच्या प्रचारावेळी काही भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्ते घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर धावून गेल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. यावेळी बोरिवली व रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

उत्तर मुंबई लोकसभा मतादारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अभीनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारावेळी रेल्वेस्थानक परिसरात भाजप समर्थकांनी ‘मोदी मोदी’च्या घोषणा दिल्या. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील ‘चौकीदार चोर है’ अशी घोषणाबाजी केली. यावेळी देन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक होऊन त्यांच्यात हाणामारी झाली. या प्रकरणी उर्मिला मातोंडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हुल्लडबाजी आणि अश्लील नाच केल्याचा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला असून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या