न्यूड फोटोमुळे जगातील सर्वात श्रीमंत माणूस आला अडचणीत

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

जगातील सर्वात धनाढ्य व्यक्ती असलेले अॅमेझॉनचे मालक जैफ बेजोस सध्या चर्चेत आहेत. ही चर्चा त्यांच्या व्यावसायिक यशाची नसून व्हायरल झालेल्या त्यांच्या न्यूड फोटोंची आहे. हे फोटो जेफ आणि आणि एका महिलेचे आहेत. जेफ व त्यांची पत्नी मॅकेंझी यांचा घटस्फोट झाला आहे. जेफ यांचे लॉरेन नावाच्या एका निवेदिकेबरोबर अफेयर होते. त्यामुळेच मॅकेंझीने जेफ यांना घटस्फोट दिल्याचे जगजाहीर आहे. पण आता जेफ यांचे दुसऱ्याच एका महिलेबरोबरचे अश्लील फोटो व्हायरल झाल्याने जैफ यांची पुरती कोंडी झाली आहे.

लॉरेनने दोन वर्ष अॅमेझॉनमध्ये काम केले आहे. अॅमेझॉनआधी लॉरेन अमेरिकेच्या फॉक्स या वाहिनीत निवेदिका म्हणून काम करायची. जैफ व लॉरेन यांना कामाव्यतिरिक्त हॉटेलमध्ये व वेगवेगळया ठिकाणी अनेकांनी पाहिले होते. यावरून जेफ आणि मॅकेंझी यांच्यात अनेकवेळा वादही झाले. अखेर २५ वर्षांच्या संसाराला पूर्णविराम देत त्यांनी घटस्फोट घेतला. पण काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील National Enquirer या टॅब्लॉईड वृत्तपत्रातील एका पत्रकाराने जेफ यांना त्यांचे काही अश्लील फोटो आपल्याकडे असल्याचे सांगत ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला.

याबद्दल जेफ यांनी ब्लॉगवर National Enquirer वर टीका करत खटला दाखल केला. त्यानंतर मात्र हे प्रकरण अधिकच चिघळले. हायप्रोफाईल प्रकरण असल्याने मीडियानेही त्यास भरपूर प्रसिद्धी दिली. याचदरम्यान काही दिवसांपूर्वी National Enquirer ने पहिल्या पानावर जेफ यांचा दुसऱ्याच एका महिलेसोबतचा अश्लील फोटो प्रसिद्ध केला. त्याखाली जेफ यांच्या पत्नीने त्यांना रंगेहात पकडले असा मथळा देत जेफ यांच्या सर्व प्रकरणांचा लेखाजोगाच मांडला आहे. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या या व्यक्तीची झोप उडाली असून हा वाद आता राजकीय वळण घेत असल्याची चर्चा अमेरिकेत सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या