अमेरिका, ओमन संघांना एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा

4

सामना ऑनलाईन । नामिबिया

अमेरिकेच्या क्रिकेट इतिहासात बुधवारचा दिवस खऱया अर्थाने ऐतिहासिक ठरला. मराठमोळा सौरभ नेत्रावळकर कर्णधारपद असलेल्या अमेरिकेच्या संघाला ‘आयसीसी’कडून एकदिवसीय संघाचा दर्जा प्रदान करण्यात आला. अमेरिका संघाबरोबर ओमान संघालाही एकदिवसीय संघाचा दर्जा मिळाला. नामिबियामध्ये क्रिकेट वर्ल्ड कप लीज डिव्हिजन-2 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अमेरिका संघाने हाँगकाँग संघाला 84 धावांनी पराभूत करून एकदिवसीय संघाचा दर्जा मिळवला. दुसरीकडे ओमानने सलग तीन सामने जिंकून एकदिवसीय संघाचा दर्जा मिळविला.