सोशल साईटवर भीक मागून झाला लखपती

18


सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

रस्त्यावर भीक मागून दोन वेळचं अन्न मिळवणारे भिकारी आपण आजूबाजूला बघत असतो. पण असाच एक पंचवीस वर्षीय तरूण चक्क ट्विटर वर भीक मागून लखपती झाल्याचे समोर आले आहे. जोवन हील असे त्याचे नाव असून तो न्यूयॉर्कमध्ये राहतो. भीक मागून तो महिन्याला 5 लाख रुपये कमवतोय.

जोवन एका रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम करत होता. त्याला उंची राहणीमान, आलिशान गाडी यांचा शौक आहे. वेटरच्या नोकरीतून मिळणाऱ्या पगारात हे सर्व शौक पूर्ण करणे शक्य नव्हते. यामुळे जोवनने एक शक्कल लढवली. त्याने ट्विटरवर आपण गरीब असल्याचे व मदतीची गरज असल्याचे जाहीर केले. तसेच त्याच्या व्यथाही त्याने सोशल साईटवर मांडल्या. त्यानंतर जोवनकडे मदतीचा ओघ सुरू झाला. बघता बघता जोवन लखपती झाला आहे. त्यानंतर त्याने घर विकत घेतले. गाडी विकत घेतली. भीक मागून त्याचे आयुष्यच बदलून गेले. नुकतेच त्याने त्याचे काही फोटो सोशल साईटवर पोस्ट केले. त्यात जोवन या घर बघून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या