अमेरिकेतील ३ लाख हिंदुस्थांनी संकटात!

1

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध अप्रवासी नागरिकांना अमेरिकेतून काढून टाकण्याच्या योजनेवरील सूटचा प्रस्ताव रद्द केला आहे. यामुळे ३ लाख हिंदुस्थांनींसोबतच जवळपास ४०लाख अवैध अप्रवासी नागरिकांना अमेरिकेतून हाकलण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांची मुलं मात्र अमेरिकेचे वैध नागरिक आहेत. तसेच अमेरिकेत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत राहण्याची मुभा देण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी याबाबतीत अवैध नागरिकांना दिलास दिला होता. ‘डापा’ (डेफर्ड अॅक्शन फॉर पॅरेन्ट्स ऑफ अमेरिकन्स अॅन्ड लॉफूल पर्मनन्ट रेसिडेन्ट्स) नितीन्वये हा दिलास देण्यात आला होता. मात्र अमेरिकेच्या २६ राज्यात या नितीला आव्हान देण्यात आल्यानं याची अमंलबजावणी रखडली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीदरम्यान दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे. ट्रम्प यांनी सत्तेत आल्यास ओबामा यांच्या अवैध अप्रवासी नागरिकांसाठीच्या नियमात बदल करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अवैध नागरिकांचे अमेरिकेत जन्मलेली मुलं अमेरिकेचे नागरिक आहेत. त्यामुळे या मुलांच्या पालकांना देशातून काढून टाकल्यास मोठं मानवी संकट उभं राहू शकतं, अशी शंका मानवाधिकार संघटनांनी उपस्थित केली आहे.