धक्कादायक! विमान ऑटो मोडवर ठेवून पायलटने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

65
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । न्य़ू जर्सी

अमेरिकेतील एका 53 वर्षीय व्यक्तीने त्याचे खासगी विमाना ऑटो पायलट मोडवर ठेवून विमानातील 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्या व्यक्तीला न्यायालयाने पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. स्टेफन ब्रॅडली मेल असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याला न्यू जर्सी न्यायलायने दोषी ठरवले आहे.

अमेरिकेतील बेडमिन्सटर येथे राहणारा स्टेफन हा तीन मुलांचा पिता असून त्याचा स्वत:चा रिअल इस्टेटचा मोठा व्यवसाय आहे. स्टेफनकडे त्याचे स्वत:चे खासगी विमान आहे. त्याच्या ओळखीच्या एका महिलेने स्टेफनला तिच्या मुलीला विमान उडविण्याचे प्रशिक्षण देण्यास सांगितले. त्यानुसार स्टेफन तिला प्रशिक्षण देत होता. मात्र एका दिवशी त्याची नियत फिरली व त्याने विमान आकाशात असतानाच ते ऑटो पायलट मोडवर ठेवले व त्या मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी न्यायलयाने त्याला दोषी ठरवले असून त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या