सूर्यमालेतील छोटय़ा ग्रहाचे नाव ठरेना

74

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

प्लुटो ग्रहापेक्षा निम्मा असलेल्या व नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे असलेल्या सूर्यमालेतील 2007 मध्ये सापडलेल्या सर्वात छोटय़ा ग्रहाचे शास्त्रज्ञांना नामकरण करायचे आहे. आतापर्यंत हा ग्रह (2,25,088a) 2007 ओआर 10 या कोड नावाने ओळखला जातो.

2007 ओआर 10 हा ग्रह कायपर बेल्टमध्ये आहे. त्याचा व्यास 775 मैल (1,247 किलोमीटर) आहे. याचा आकार हा प्लुटो ग्रहाच्या निम्मा आहे. प्लुटोसुद्धा एक लघुग्रहच आहे. शास्त्रज्ञांनी लोकांकडून या ग्रहासाठी नावे मागवली आहेत. जगभरातून आलेल्या नावांपैकी आता ‘गॉन्गोंग’, ‘होला’ आणि ‘किली’ असे तीन पर्याय समोर आहेत. गॉन्गोंग हे चिनी देवतेचे नाव आहे. होला ही युरोपियन देवता आहे तर तर किली हा एक नॉर्डिक देव आहे. तिघांच्याही काही पौराणिक आख्यायिका आहेत. या तीनपैकी ज्याला 10 मेपर्यंत सर्वाधिक पसंती मिळेल ते नाव इंटरनॅशनल ऍस्ट्रोनॉमिकल युनियनला सुचविण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या