साखरेचा असाही उपयोग

पदार्थ गोड करण्यासाठी वापरण्यात येणारी साखर ही केवळ पदार्थापुरतीच मर्यादित नसून ती तेवढीच बहुगुणी आहे.

  • साखरेत नारळाचे तेल एकत्र करुन चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा. चेहऱ्यावरची मृत त्वचा जाऊन साफ होते.
  • जास्त गरम खाल्ल्याने जीभ भाजली तर थोडी साखर तोंडात घाला, आराम मिळेल.
  • वाटलेली साखर कोमट पाण्यात एकत्र करुन कपड्यांना लावल्यास डाग निघून जातात.
  • हातांवर ग्रीस वा ऑईलचा डाग लागल्यास साखरेत ऑलिव्ह ऑईल एकत्र करून लावा.
  • राहिलेला केक पुन्हा कंटेनरमध्ये ठेवण्यापूर्वी खाली साखरेचे दाणे घाला. अधिक टिकेल.
  • चीजही फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यावर साखर पसरवा. चीज बरेच दिवस टिकते.
  • केळ्याच्या पेस्टमध्ये ऑलिव्ह ऑईल आणि साखर एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचा कोमल होते.
  • व्हिनेगरमध्ये साखर एकत्र करुन फुलदाणीत ठेवल्यास फुले ताजी राहतात.