खासदारांच्या कार्यालयात सापडतायत वापरलेले कंडोम, कर्मचारी साफ करून हैराण


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ब्रिटनमधील खासदारांच्या कार्यालयामध्ये वापरलेले कंडोम आणि ओकारी करून घाण केलेल्या जागा सापडत आहेत. या प्रकारामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. ‘संडे टाइम्स’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

वृत्तानुसार, या प्रकारामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. खासदार काम करण्याची जागा खराब करत असल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी खासदारांना अधिक कडक नियम आणि अटींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका अधिकाऱ्यांना यावर कडक शब्दात प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘अशा प्रकारचे वर्तन तुम्ही आठवड्याच्या सुट्टीवर असणाऱ्या मुलांकडून करू शकता, खासदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून नाही.’

‘द गार्डीयन’ने एका सफाई कर्मचाऱ्याचा दाखला देत लिहिलं आहे की, खासदारांच्या या आचरट प्रकाराचा पत्ता लागल्यानंतर हैरान झालो नाही. त्यामुळे सफाई करताना वापरलेल्या कंडोम आणि इतर गोष्टी मिळणार याची खात्री होती. याआधी अनेक खासदारांना लैंगिक अत्याचार आणि शोषणाप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. यात सर्वात वरचे नाव सुरक्षा सरचिटनीस सर मायकल फॉलन यांचे असून त्यांनी महिलांबाबत आपण केलेल्या दुर्व्यवहार प्रकरणी कॅबिनेटचा राजीनामाही दिला होता.