बहुगुणी कढीपत्ता

कढीपत्ता जेवणाची चव आणि सुगंध दोन्ही वाढवते. आयुर्वेदानुसार कढीपत्त्यामध्ये असलेले पोषक पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

 • रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण राहते.
 • कढिपत्ता रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. कढीपत्त्यामध्ये असलेले फायबर इन्सुलिनवर परिणाम करून रक्तातील साखरेवर नियंत्रण आणते.
 • वजन आटोक्यात राहते.
 • कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने वजन आटोक्यात राहते आणि पचनकार्य सुधारते.
 • कढीपत्त्यामध्ये ‘कार्मिनेटिव्ह’ नावाचा घटक असतो, ज्यामुळे पोटफुगी दूर होते.
 • त्वचेच्या आजारापासून दूर राहते.
 • कढीपत्ता ऍण्टी-ऑक्सिडेंट, ऍण्टी-बॅक्टेरियल, ऍण्टी-फंगल घटक असून फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासून बचाव करतो.
 • ऑनिमिया होण्यापासून वाचवतो.
 • कढीपत्त्यात आयर्न आणि फॉलिक ऑसिडचा स्रोत असतो. आयर्नची कमी फक्त शरीरात आयर्न नसल्याने नाही तर शरीरामध्ये आयर्न मुरत नसल्यामुळेही होते. याव्यतिरिक्त फॉलिक ऑसिड आयर्न शोषून घेण्यास मदत करतो.
 • कढीपत्ता या दोन्ही कामांसोबत ऑनिमिया कमी करण्यासही मदत करतो.
 • कॉलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवते.
 • ते हृदयाला मजबूत करते आणि कॉलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते.
 • जिभेवरच्या संवेदना वाढवते.
 • पदार्थ चविष्ट होण्यासाठी आपण कढीपत्ता वापरतो, पण कढीपत्त्यातले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते. त्यामुळे जेवण रुचकर लागते.