मातीचा तवा

आधुनिक काळात मातीची भांडी कालबाह्य झाली आहेत, या मातीच्या भांड्यामध्ये जेवल्यावर अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया मातीच्या तव्यावरची पोळी खाल्ल्यावर काय काय होते?

  • मातीच्या तव्याचा फायदा
  • मातीच्या तव्यावर पोळी बनवल्याने त्यामधील एकही पोषकतत्त्व नष्ट होत नाही. अॅल्युमिनियमच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने त्यातील ८७ टक्के पोषकतत्त्वे कमी होतात.
  • केवळ मातीच्या भांड्यात बनवलेल्या पदार्थांमध्ये १०० टक्के पोषकतत्वे कायम राहतात.
  • पितळेच्या भांडयात पदार्थ बनवल्याने ७ टक्के पोषकतत्वे कमी होतात.
  • ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, त्यांनी मातीच्या तव्यावर बनलेल्या पोळ्या खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते.
  • मातीच्या तव्यावर बनलेल्या पोळ्यांना खमंग वास येतो. त्या स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात. पोळ्या त्यावर बनवताना मातीचे तत्व पोळ्यांमध्ये शोषले जाते यामुळे त्याची पौष्टिकता अधिक वाढते.
  • सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या साधारण झालीये. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय त्यांनी मातीच्या तव्यावर बनवलेली पोळी खाल्ल्याने त्रास दूर होतो.
  • काळजी कशी घ्याल
  • मातीचा तवा वापरताना मंद आचेवर वापर करा.
  • हा तवा पाण्याने न धुता, त्याचा वापर झाल्यावर कपड्याने स्वच्छ करा.