शंखनाद

  • गजेंद्र रघुवंशी

कृष्णाचा पांचजन्य शंख. त्याने केलेला शंखनाद. सृजनाचा… अन्यायाविरुद्ध श्री विष्णूची पूजा शंखाशिवाय पूर्ण होत नाही.

आपल्या हिंदू धर्मात पूजाअर्चा खूपच महत्त्वाची आहे… आणि शंखनाद झाल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्णच होत नाही. असे असले तरी फक्त पूजास्थानीच शंखाचे महत्त्व आहे असे नाही, तर शंखाचे काही आरोग्यदायी फायदेही आहेत. शंख वाजवल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते. त्याचबरोबर शंख वाजवणे आपल्या शरीरालाही लाभदायक असते. जोरात शंख वाजवल्यामुळे गॅस्ट्रिक आणि पोटाच्या अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकते. त्याचबरोबर पोटाच्या विकारांना दूर ठेवण्यास मदत होते. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या चार आयुधांमध्ये एक शंख आहे. इतकेच नव्हे तर शंखाची पूजा केल्याखेरीज विष्णूची पूजा केल्यास ती त्यास पोहोचत नाही, अशी मान्यता आहे. शंख ठेवण्याकरिता कासवाच्या आकाराचे जे आसन असते त्याला अडणी म्हणतात.

शंख वाजवल्यामुळे आपल्या शरीरातील छातीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. शंख वाजवल्यामुळे आपल्या गळ्याच्या स्नायूंनाही पुरेसा व्यायाम मिळतो. विकल कॉर्ड आणि थायरॉईडशी संबंधित समस्या दूर होतात. प्रत्यक्ष शंख वाजवत असताना शरीरात रक्तप्रवाह वेगाने होतो. त्याचबरोबर केस गळण्याची समस्या असेल तर तीदेखील दूर होते. शंख वाजवण्याचे आणखी बरेच फायदे आहेत. यात चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या यामुळे थांबू शकतात. शंखाचे एकूण तीन भाग पडतात. १) शंखाची पन्हळ, २) ज्या ठिकाणाहून शंखात घातलेले पाणी पडते ते अग्र आणि ३) ज्यावर वलये असतात ती मागची बाजू.

देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून जी १४ रत्ने बाहेर आली त्यामध्ये एक शंख आहे. पुरातन काळी अनेक प्रकारच्या पुण्यकर्मांच्या वेळी, विवाहप्रसंगी, युद्धाच्या वेळी शंखध्वनी खूप महत्वाचा मानला जातो. मंदिरामध्ये शंखध्वनीचे विशेष महत्व आहे. तंत्रोक्त विधीमध्ये शंखाद्वारे अभिषेकाचे अलगच महत्व आहे. शंखध्वनींमुळे उत्पन्न होणाऱ्या कंपनांमुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व पवित्र होते. तसेच तो फुंकणाऱ्या व्यक्तीच्या फुप्फुसाची क्षमता काढून तेज व ओजवृद्धी होते.

शिवपूजेत महत्व नाही
शिवपूजेत शंखाची पूजा केली जात नाही. शिवाला शंखाचे पाणी घालून स्नान घालत नाहीत. देवांच्या मूर्तीमध्ये पंचायतनाची स्थापना असेल तर त्यातील बाणलिंगावर शंखोदक घालण्यास हरकत नाही; पण महादेवाची पिंड असलेल्या बाणलिंगाला शंखोदकाने स्नान घालू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. शिवपिंडीत शाळुंकेच्या रूपात स्त्रीकारकत्व असल्याने स्त्रीकारकत्व असलेल्या शंखातील पाणी पुन्हा घालण्याची आकश्यकता नसते. बाणलिंगाबरोबर शाळुंका नसल्याने त्याला शंखाच्या पाण्याने स्नान घालतात.

अशी करा शंखपूजा
शंखाचा निमुळता चोचीसारखा किंवा पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा. शंख अर्थातच पोकळ बाजू वर करून ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील. वाजवण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरून ठेवावा. तो देवपूजेकरता घेऊ नये. तो निव्वळ ‘शंखध्वनी’ करण्याकरताच वापरावा. त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी. शंखाला हळदकुंकू वहात नाहीत, तसेच गंधाक्षतफूल न वाहता, निव्वळ गंधफूल वहावे, शक्यतो पांढरे फूल वहाके. पूर्वी गंध म्हटल्यावर, चंदनाचे उगाळून केलेले गंधच असायचे. हल्ली निरनिराळ्या रंगांची किंवा मातीची गंधे मिळतात. त्यातील शक्यतो पांढरे वा पिवळट गंध वापरावे. कुंकू कालवून केलेले गंध शंखासाठी वापरू नये.

शंखाचे असेही फायदे
शंखामध्ये एक रात्रभर पाणी भरून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी या पाण्याने त्वचेवर मसाज करा. यामुळे त्वचेचा कोणताही रोग गायब होतो. संपूर्ण रात्रभर शंखामध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये गुलाबजल मिसळून केस धुतल्यामुळे ते काळे होतातच, शिवाय ते मुलायम आणि दाटही होतात. रात्रभर शंखामध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये तेवढेच पाणी मिसळून डोळे धुतल्यास डोळेही निरोगी होण्यास मदत होते. शंखामध्ये रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी तीन चमचे दररोज घेतल्यास बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटकारा मिळतो. शंख वाजवल्याने प्रोस्टेट मसल्सचा व्यायाम होतो. आंघोळीनंतर शंख त्वचेवर घासल्यामुळे त्वचा उजळते. त्वचा टवटवीत होते.