सततचा मोबाईल वापर ठरतोय जीवघेणा, एका वर्षात २१३८ ठार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गाडी चालवताना मोबाईल फोनवरती बोलणे हे जीवघेणे ठरत आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाच्या अहवालानुसार बाईक चालवताना फोनचा वापर केल्याने वर्षाला तब्बल २१३८ लोकांनी आपला जीव गमावला आहे.

खाजगी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार गाडी चालवताना मोबाईलच्या वापराने मृत्यू होत आहेत. त्यासोबतच गतीरोधक, खराब रस्ते आणि रस्त्यांचे अर्धवट बांधकाम या इतर कारणांमुळे रोज २६ जणांचा मृत्यू होत असल्याचे सांगितले आहे.

परंतु या अहवालानुसार सगळ्यात जास्त मृत्यू होण्याचे कारण म्हणजे बाईक चालवताना होणारा सततचा मोबाईलचा वापर.

अशा प्रकारे गाडी चालवताना मोबाईल वापरण्याने सगळ्यात जास्त मृत्यू हे उत्तर प्रदेशामध्ये झाले आहेत. तर हरियाणाचा दुसरा क्रमांक लागतो. ह्याच कारणाने गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात १७२ तसेच दिल्लीत २ जणांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत रस्ते परिवहवन मंत्रालयाने याबाबत राज्यवार माहिती दिली आहे. यावरून जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, गाडी चालवताना मोबाईल वापरतात त्यांचा अपघात होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. तसेच अहवालानुसार देशात दर तासाला १७ जणांचा अपघाती मृत्यू होतो. मात्र सगळ्यात जास्त रस्त्यांवरचे अपघात हे वाहन चालवताना मोबाईल वापरल्यानेच होतात.