नेदरलॅण्ड ट्राम हल्ला; हल्लेखोराच्या गाडीत पत्र सापडले

1

सामना ऑनलाईन। उत्रेच

उत्रेच शहरात ट्राममध्ये गोळीबार करणाऱया हल्लेखोराच्या गाडीत पत्र सापडले असून अधिक तपास केल्यावरच हा हल्ला दहशतवादी हल्ला होता की, नाही, हे ठरवता येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

उत्रेचमधील ट्राममध्ये गोळीबार केल्याप्रकरणी आतापर्यंत तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य हल्लेखोर गोकमेन तानिश (37) हा तुर्कस्थानी वंशाचा आहे. अटक करण्यात आलेले दोघे आरोपी 23 आणि 27 वर्षांचे आहेत. हल्ल्यानंतर गाडीतून पळून जाण्याचा त्यांचा कट होता. ही गाडी जप्त करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या हल्ल्यात एका तरुणीसह तिघा जणांचा मृत्यू झाला.