उत्तर प्रदेशमध्ये भाजपला धक्का, मित्रपक्षाने सोडली साथ

2
om-prakash-rajbhar

सामना ऑनलाईन । लखनौ

लोकसभा निवडणुकीआधी उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी योगी सरकारमधून त्यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता सुहेलदेव भारतीय समाज पक्ष लोकसभा स्वतंत्र लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे.

ओमप्रकाश राजभर यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून भाजपला अल्टिमेटम दिला होता. जर भाजपने जागा वाटपाविषयी 100 दिवसात निर्णय कळवला नाही तर आम्ही उत्तरप्रदेशमधील सर्वच्या सर्व 80 जागा लढवू असा इशारा त्यांनी दिला होता.