व्हे प्रोटिन म्हणजे काय?

  • विनोद पाष्टे, व्यायामतज्ञ

व्हे प्रोटीन पावडर… प्रत्येक व्यायामपटू, क्रीडापटूला कमी-अधिक प्रमाणात हे घ्यावे लागते. ते किती घ्यावे, कसे घ्यावे यावर थोडे सविस्तर…

त्तम शरीरसौष्ठव ही आजच्या तरुणाईची आवड आहे. त्यासाठी व्यायामशाळेची निवड केली जाते. भरपूर व्यायामही केला जातो. व्यायामानंतर स्नायूंना बळकटी येण्यासाठी प्रथिनांची अत्यंत आवश्यकता असते. पण ही प्रथिनं कोणत्या माध्यमातून मिळवावीत किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स किती घ्यावीत असे अनेक प्रश्न तरुणांच्या मनात असतात. या प्रश्नांची ही थोडीशी उत्तरं…

व्हे प्रोटीन दुधापासून बनवलेले आहे. व्हे प्रोटीन म्हणजे आपण जे पनिर किंवा चीज बनवताना जे पाणी शिल्लक राहते. त्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याची पावडर बनवतात. स्नायू दुरूस्त करणं हे खरं तर आपण कुठल्या पद्धतीचा व्यायाम करतो यावर अवलंबून असते. दोन गोष्टी महत्वाच्या असतात त्या म्हणजे योग्य आराम आणि योग्य आहार. आहार म्हणजे काय तर तुमचे स्नायू हे प्रोटिन सेलचे बनलेले असतात. त्यामुळे व्हे प्रोटीन मदत करतात स्नायू मायक्रोव्हेट लेव्हलला रिपेअर करायला व्हे प्रोटिन मदत करतात. तुमच्या स्नायूंची क्षमता वाढवण्यासाठी प्रथिने महत्वाची आहेत. स्नायू बळकट करण्यासाठीही प्रथिने महत्वाची भूमिका बजावते. मी व्हे प्रोटीन नाही म्हणत, येथे प्रथिने महत्त्वाची आहेत.
तरुणांनी किती प्रमाणात प्रथिने घ्यावीत हे त्यांच्या व्यायामाच्या प्रमाणावर आणि तीव्रतेवर अवलंबून असते. त्यांची जीवनशैली कशी आहे आणि ते किती प्रमाणात आराम घेतात याचे योग्य नियोजन करून एखाद्या त्या विषयांतल्या तज्ञांचा सल्ला घ्यावा. एखाद्या तज्ञांच्या सल्ल्याने अशा प्रकारचे प्रथिने घ्यावे. डॉक्टर एखाद्याच्या गरजा लक्षात घेऊन त्याला व्हे प्रोटीनचा सल्ला देऊ शकतात. एखाद्याला किती प्रमाणात व्हे प्रोटीन घ्यायला हवे आणि कोणत्या वेळी हे ते योग्य प्रकारे सांगू शकतात. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की व्हे प्रोटीन मॅजिक पावडर आहे. खा आणि शरीर कमवा असे नाहीय. हे प्रमाणावर अवलंबून आहे. जेवणात चरबीचे प्रमाण किती असले पाहिजे, प्रथिनांचा सहभाग कसा आणि कुठल्या प्रकारे करता येईल हे जेवढे महत्त्वाचे तेवढेच व्यायाम करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय खायचे हे दोन घटक महत्वाचे असतात. व्यायामाच्या आधी जे खातात त्यामुळे व्यायामाला मदत करते आणि जे व्यायामानंतर खाता, त्याची मदत व्यायामात जे खर्च केले ते पूर्ववत करण्यासाठी होते. म्हणून व्यायामाआधी आणि नंतर काय खायचे त्याचे प्रमाण ठरलेले असते आणि ते तज्ञच सांगू शकतात.

खेळाडूंसाठी प्रथिने खूपच महत्त्वाची आहेत. बऱ्याचदा खेळाडूंमध्ये खेळण्याची चांगली क्षमता असते. पण तरीही ते मागे पडतात. त्यांची अडचण अशी असते की त्यांची ही क्षमता, ऊर्जा शेवटपर्यंत टिकत नाही. म्हणजेच त्यांचा त्यांचा ऊर्जा स्त्रोत चुकीचा असतो. कधीही आणि कुठेही खाण्याची पद्धत चुकीची असते. वास्तविक न्यूट्रिशन्स आणि प्रथिने आपल्या नेहमीच्या जेवणातून शरीरात किती जात आहेत हे माहिती असणे आवश्यक असते.

आपण एखादी परीक्षा देतो तेव्हा दिलेली पाने संपल्यावर आपण सप्लिमेण्ट मागतो. सप्लीमेण्टचा फायदा हाच की ज्यावेळी शरीराला जेव्हा न्यूट्रिशन्स पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत तेव्हा व्हे प्रोटीन सप्लिमेंट म्हणून काम करते. एखाद्या खेळाडूला पूरक ऊर्जा हवी आणि जलद ऊर्जा हवी. अशावेळी त्याने जर जास्त खाल्ले तर आहार जड होणार. मात्र प्रमाणात खाल्ले तर त्याला जास्त प्रथिने मिळतात.

दुष्परिणाम प्रत्येक गोष्टीचे असतात. तुम्ही जर व्यायाम केला नाही आणि नुसती प्रथिने घेतलीत तर त्याला काही अर्थ नाही. गरजेपेक्षा जास्त घेऊ नका. बऱ्याचदा व्हे प्रोटीन घेण्याचा सल्ला दिला जातो किंवा इंटरनेटवर वाचून भरमसाट व्हे प्रोटीन घेतले जाते. दिवसाला पंधरा-वीस स्कूप घेतली जातात आणि तेही रिकाम्या पोटी… पण प्रथिने किती प्रमाणात घ्यायची हे तज्ञांना विचारून त्यांच्या सल्ल्याने घेतलेली केव्हाही चांगली.

शरीरसौष्ठवासाठी आवश्यक
अंडी, चिकन, फिश खाऊ शकतात. पनिर, टोफू, मश्रुम, ब्रोकोली खाऊ शकतो. शाकाहारी पदार्थांमध्ये फारशी प्रथिने नसतात. आज हिंदुस्थानी बाजारपेठांमधील शाकाहारी पदार्थांमध्ये बरीच प्रथिने असल्याचे दिसते. शरिरसौष्ठवासाठी प्रथिने खूप आवश्यक आहेत, स्नायू बळकट होण्यासाठी ही प्रथिने गरजेची असतात. एखादा आजार असेल तर त्यावर योग्य उपचारपद्धती करायचीच, पण त्याबरोबरच व्हे प्रोटीन त्या माणसाला आजारातून बाहेर काढायला मदत करतात.

दुसरे म्हणजे जीवशास्त्रीय मूल्य. तुम्ही जे खाता त्याचा तुमचे शरीर किती वापर करून घेऊ शकते त्याला महत्त्व आहे. प्रथिनांचे जीवशास्त्र्यीय मूल्य जेवढे चांगले असते, तेवढा शरीरावर त्याचा जास्त प्रभाव पडतो. म्हणूनच व्हे प्रोटीन हा खेळाडूंसाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.