सुट्टीतलं घर

>>रतींद्र नाईक<<

सुट्टीत फिरायला गेल्यावर आता ‘व्हेकेशन होम्स’चा निवांत पर्याय उपलब्ध होऊ लागला आहे.

उन्हाळ्याच्या  सुट्टीत फिरायला जाण्याची संधी प्रत्येकालाच हवी असते. पण तेथील हॉटेल्स, रिसॉर्टची नोंदणी आधीच झालेली असल्याने तेथे जागा मिळत नाही. बऱ्याचदा हॉटेल्सचे नको इतके व्यावसायिक वातावरण मनास पटत नाही. घरातले पेट्सही बरोबर असतात. अशावेळी छोटी घरं पर्यटनाच्या ‘ठिकाणी भाड्याने मिळण्याची सोय बऱ्याच ठिकाणी होऊ लागली आहे. त्यामुळे सुट्टीतला निवांतपणा अनुभवता येतो.

पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निळेशार समुद्रकिनारे, हिरवागार निसर्ग प्रत्येकालाच खुणावत असतो. दरवर्षी येथे लाखो पर्यटक येत असतात. पर्यटकांची आवड आणि गरज लक्षात घेऊन मालवणातील तारकर्ली, देवबाग, चिवला बीच या स्थळांवर पर्यटकांना राहण्यासा’ठी किचनसहित अनेक घरे उपलब्ध आहेत. शहरातील घरांप्रमाणेच अटॅच किचन असल्यामुळे पर्यटकांची सोय होत असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक रवी कासले यांनी दिली. कुडाळ, मालवण, कणकवली येथे बंगले व लहान घरे पर्यटकांना राहण्यासाठी भाडयाने मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, दापोली हर्णे, आरे वारे बीच, गुहागर समुद्र किनाऱ्यावर किचन सहित अटॅच गेस्ट हाऊस उपलब्ध आहेत. याशिवाय रायगडमधील अलिबाग किनाऱ्याजवळही ती आढळून येतात.

महाराष्ट्रात थंड हवेची ‘ठिकाणे असलेल्या महाबळेश्वर आणि माथेरान येथेही स्थानिकांनी पर्यटकांची गरज ओळखून किचन अटॅच घरे तयार केली आहेत. चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्यात वाघ तसेच वन्य जीवांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून पर्यटक येत असतात. या पर्यटकांसा’ठी स्वतंत्र स्वयंपाकगृह असलेली घरे उभारलीत परंतु पर्यटक हॉटेल, रिसॉर्टऐवजी अशा घरांमध्ये राहणे पसंत करत आहेत.

सुट्टीत फिरायला जाताना हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा टुमदार छोट्याशा बंगल्यात राहायला मिळालं तर जास्त मजा येईल. पण त्यासाठी असे बंगले कोण भाड्यावर देतंय ते माहीत असायला हवं. थेट त्या त्या ‘ठिकाणच्या त्या त्या माणसाशी संपर्क साधून बंगले बुक करता येतील.

येथे संपर्क साधू शकाल

रवी कासले (मालवण) : ७५८८१४०६०१

दत्तात्रय शिंदे (माथेरान) : ९२७२५५९४४५

सत्यवान घाडे (गुहागर) : ९४२११३७९५४

अविनाश ठाकूर (वेळणेश्वर) : ९५५२७७५७४५

अमित पाटील (हर्णे) : ८०८७९८०२३९,

आशीष गुरव (दापोली – मुरुड) : ९२७०९६९८३७

प्रतीक शहा (महाबळेश्वर, पाचगणी) : ८५५१००७३९०