वैभवी पालखी सोहळ्यातील नव्या तंबूची १५ वर्ष सेवा

सामना प्रतिनिधी । आळंदी

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वैभवी लवा जम्यातील महत्त्वाचा असणारा पालखी सोहळा तळावरील वैभवी मुक्काम.यावर्षी नवीन तंबूची सेवा १५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.श्रींचा सोहळा पालखी मुक्कामी येण्यासाठी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन केले जाते.

पालखी तळ समीप येण्यापूर्वीची सोहळ्यातील वैभवी भगवी पताका ध्वज स्तंभ व श्रींचा तंबू उभारण्यात येतो.पताका व श्रींचा तंबू सोहळा तळावर येण्यापूर्वी उभारण्याची लगबग काही वेळ अगोदर पालखी तळावर असते.श्रींचे सोहळ्यातील सेवक यासाठी धावपळ करून सेवारत असतात.श्रींचे सोहळ्यातील वैभवी भगवी पताका ध्वज स्तंभ उभारून त्यावर भगवी पताका श्रींचे सोहळ्याचे परिसर पालखी तळाकडे लक्ष वेधतो.श्रींचा ध्वजस्तंभावर भगवी पताका आणि श्रींचा तंबू तळावर परंपरेने उभा राहिल्या शिवाय इतर सोहळ्यातील दिंड्या दिंड्यातील तंबू,राहुट्या उभारल्या जात नाहीत. श्रींचे मुक्कामाची,स्वागताची व पाहुणचाराची व्यवस्था निर्माण झाल्यानंतर इतर दिंड्यातील राहुट्या उभारल्या जातात.श्रींचे पालखी सोहळ्यातील नित्य नैमित्तिक उपचार,धार्मिक विधी, पूजा, अभिषेक आणि भाविकांना श्रींचे दर्शन व्यवस्था श्रींचे वैभव शाली तंबूत पालखी मुक्काम तळावरील सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत होते.यासाठी काही वर्षांपूर्वी श्रींचे जुन्या तंबूचे नूतनीकरणाचा गरज ओळखून नवीन तंबूची सेवा घेण्यात आली.यावर्षी नवीन तंबूची सेवा १५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.यासाठी श्रींचे अश्व सेवेचे मानकरी आणि सोहळ्यास प्रथेप्रमाणे सोहळ्यास वैभवी लवाजमा उपलब्ध करून देणारे श्रीमंत सरदार उर्जितसिंह शितोळे सरकार यांचे मार्गदर्शनाखाली जुन्या तंबू चे ढाच्या प्रमाणेच नवीन तंबू विकसित करून सोहळ्यास अर्पण करण्यात आला.यासाठी भाविक वारकरी यांनी योगदान देत श्रींचे सोहळ्यास नवीन वैभवी तंबूची आणखीच भर पडली.

माऊलींचे वैभवी सोहळ्यात भाविकांचे सहकार्यातून नवीन तंबूचे सेवेने भर घालण्यात आलेला तंबू भोसरी तील मे.कुमार तन्ना उद्योग समूहाचे सहकार्याने तत्कालीन व्यवस्थापक अंकुश पाटील यांचे देखरेखी खाली सोहळ्यातील पूर्वीचे तंबूचे ढाच्या व ठेवणी नुसार विकसित करून सोहळ्यात लोकार्पण करून सेवारत करण्यात आला होता.यासाठी श्रींचा जुना तंबू अंकली येथून आणण्यात आला.यासाठी कोल्हापूर येथील सरोजिनी डेव्हलपर्सचे राजू वडगावकर,स्वामी सुभाष महाराज,तसेच आळंदीतील स्व.तुकाराम आप्पा चव्हाण यांनी तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी व सोहळ्यातील जाणकारांनी विशेष परिश्रम घेतले.श्रींचे वैभवी पालखी सोहळ्यात यामुळे भर पडली.श्रीमंत सरदार उर्जितसिंह शितोळे सरकार यांचे मार्गदर्शनाखाली सोहळ्यातील प्रवासा दरम्यान अडचणी, समस्यां, तक्रारींचे निवारण शितोळे सरकार यांचे पालात पालखी तळावरील मुक्कामात परंपरेने होत असते.