वज्रेश्वरी मंदिरावर दरोडाप्रकरणी 5 जण अटकेत

2
robbery in vajreshwari temple

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वज्रेश्वरी मंदिरात दरोडा टाकणाऱ्या 5 आरोपींना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तसेच फरार तीन आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

10 मे रोजी दानपेटी फोडून दरोडेखोरांनी 7 लाख 10 हजार रुपये चोरून नेले होते. त्या पैकी 2 लाख 83 हजार रुपये आणि दोन मोटार सायकल, असा एकूण 3 लाख 83 हजराचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, अटकेतील पाच आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

Video- वज्रेश्वरी मंदिरातील दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद