वांग्याचे भरीत

12

साहित्य : भरीताचं एक मोठं वांगं, हिरव्या मिरच्या चार-पाच, कोवळे मटार दाणे एक वाटी, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, दोन कांदे, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ.

कृती : सर्वप्रथम वांग्याला तेलाचा हात लावून ते सगळीकडे नीट भाजून घ्या. नंतर थोडावेळ पातेल्याखाली झाकावे. म्हणजे साले पटकन निघतात. साले काढून मऊ कुस्करून घ्यावे. तेलात जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरचीचे तुकडे, अर्धवट ठेचलेले मटार दाणे घालून परतावे. त्यानंतर वाफ आणून मीठ व वांगे घालून पुन्हा परतून घ्यावे. वरून कोथिंबीर घालावी. गरमागरम भाकरीसोबत छान लागते.