या लहान-लहान गोष्टींकडे करून नका दुर्लक्ष…कंगाल करणाऱ्या ‘या’ चुका टाळा…

हिंदु धर्मात दिशांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.  याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होत असतो. कोणतीही वास्तू ही सुख, समृद्धीशी निगडीत आहे. त्यामुळे घरातही या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. वास्तू शास्त्रात सांगण्यात आलेल्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तिचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे घरात सुख, समृद्धि आणि शांती येण्यासाठी काही चुका टाळणे आवश्यक असते. या चुका टाळल्यास व्यक्तिच्या आयुष्यात भरभराट येण्यास मदत होते.

– बऱ्याचदा घरात एखाद्या दिशेला चुकीची वस्तू ठेवली जाते. यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकते. याचा परिणाम कुटुंबातील सुख, समृद्धीवरही होतो.

– वास्तू शास्त्रानुसार, रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवू नयेत. यामुळे अन्नपूर्णा देवीची अवकृपा होते. त्यामुळे रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवू नयेत.

– अंथरुणात बसून जेवणे अशुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मीदेवीची अवकृपा होते.

– वास्तूशास्त्रानुसार, केराची बादली किंवा कचरा टाकण्याची बादली आपल्याला वाटेल त्या दिशेला ठेवणे अयोग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. काही जणांना कचऱ्याची बादली घराच्या प्रवेशद्वारावरच ठेवण्याची सवय असते. शास्त्रानुसार, असे केल्यास श्री लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. त्यामुळे कचऱ्याची बादली कधीही दारात ठेवू नये.

– न्हाणीघरात कधीही रिकामी बादली ठेवू नये. वास्तूशास्त्रात रिकामी बादली ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.

– घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला स्वयंपाकघर असू नये. या दिशेला स्वयंपाकघर असल्यास अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता असते.

– सूर्यास्तानंतर घरात केर काढू नये. सायंकाळी घरात केर काढल्याने लक्ष्मीदेवी नाराज होते.