राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलवर ४ टक्के वॅट कमी, इंधन स्वस्त

राजस्थानच्या रणरागिणी वसुंधरा राजे.

सामना ऑनलाईन । जयपूर 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थान सरकराने पेट्रोल व डीझेल वरील ४ टक्के वॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेलांच्या किंमती २ ते २.५० रुपयांनी स्वस्त होणार आहे. पंजाब आणि कर्नाटकात युतीत असलेले क्राँग्रेसप्रणीत सरकार वॅट कमी करण्याचा विचारात आहेत, त्यात वसुंधरा राजे यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. तर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेट्रोल डीझेल वरील वॅट कमी करण्याच्या विचारात आहे.

काँग्रेसने पेट्रोल डीझेलवरील वाढत्या दरांमुळे मोदी सरकाराला कोंडीत पकडण्यासाठी १० सप्टेंबर रोजी हिंदुस्थान बंदचे आवाहन केले आहे. त्याला बहुतांश विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.

पंजाब आणि कर्नाटकात पेट्रोल डीझेलवरी दर कमी होऊ शकतात, अशी माहिती ऑल इंडिया कांग्रेस कमिटीच्या हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनी पटेल यांनी दिली. तसेच काँग्रेस शासित पंजाब आणि कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्र्यांना पेट्रोलियम उत्पादनांवर वॅट कमी करण्याचे आधीच सांगितल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.