वाहनचोरी करणारी आंतरराज्यीय टोळी पकडण्यात रत्नागिरी पोलीसांना यश

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

वाहनचोरी कंरणारी आंतरराज्यीय टोळी रत्नागिरी स्थानिकं गुन्हा अन्वेषण शाखेने पकंडली आहे. बंगळूरु येथे दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर कोल्हापूरमध्ये आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली.

१९ नोव्हेंबर रोजी निवळी येथून एक डपर चोरीला गेला. जिल्ह्यामध्ये याच प्रकारचे यापुर्वी ५ ते ६ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यामध्ये आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याचे वाटत असल्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तपास सुरु केला. चोरी झालेला डंपर बंगळुरु येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर तीन पथके तयार करुन कोल्हापूर आणि बंगळूरु या ठिकाणी पाठवण्यात आली.

२३ डिसेंबरला बंगळुरू येथे आदिल उल्ला सदाफ उल्ला खान(४८) , परवेझ रहमतउल्ला खान उर्फ हाजी (४८) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर २४ डिसेंबर रोजी इसहाक कुतूबुददीन मुजावर (४३) याला अटक करण्यात आली. या आरोपींकडून शाहूवाडी कोल्हापूरहून चोरीला गेलेला डंपर हस्तगत करण्यात आला. या आरोपींनी रत्नागिरी हर, देवरुख, चिपळूण, रत्नागिरी ग्रामीणमध्ये वाहनचोरी केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस आधक्षक प्रणय ओक, अप्पर पोलीस आधक्षक निते घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शिरीष सासणे, रवीराज फडणीस, संजय कांबळे, दिपू साळवी, राके बागुल, दिने आखाडे, उदय वाझे, मिलींद कदम, विजय आंबेकर, सागर साळवी, अमोल भोसले आणि दत्ता कांबळे यांनी केली.