पुणे: पोलिसांनी जप्त केलेल्या ८० गाड्या जळून खाक

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । देहूरोड

देहूरोड पोलीस ठाण्याच्या मागील मोकळ्या पटांगण्यात पोलीसांनी ठेवलेल्या गाड्यांना आज संध्याकाळच्या सुमारास अचाकन आग लागली. यामध्ये ७०-८० गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

शहरात बेवारास पडलेल्या, जप्त केलेल्या किंवा अपघातग्रस्त गाड्या देहूरोड पोलीस स्टेशनच्या मागच्या मोकळ्या पटांगणात ठेवण्यात येतात. अशा शेकडो गाड्या या पटांगणात होत्या. आज संध्याकाळी अचानक या गाड्यांनी पेट घेतला. बघता-बघता ही आग वाढली आणि ७०-८० गाड्या यात जळून खाक झाल्या. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची सांगण्यात येते.