‘मुळा-मुठा’ हे काय नाव आहे? बदलून टाका!, व्यंकय्या नायडूंची अजब मागणी

व्यंकय्या नायडूंच्या अजब मागणीने पुणेकर धस्स

प्रतिनिधी, पुणे

मुळा-मुठा हे काय नदीचे नाव आहे ? बॉम्बेच जस मुंबई केल, तसच काहितरी दुसर नामकरण करा, या भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रिय मंत्री व्यंंकय्या नायडू यांनी केलेल्या अजब मागणीने पुणेकरांना धस्स केले. नायडू यांच्या या मागणीमुळे पुणेकरांच्या अस्मितेचा प्रश्न आज निर्माण झाला. ऐन निवडणूकीच्या धामधुमीत पुणेकरांचा स्वाभिमान दुखावल्याने भाजपला घाम फुटला आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी आलेले व्यंकय्या नायडू यांनी आज पत्रकार परिषद घेतली. केंद्र सरकारच्या मुळा – मुठा नदीसुधार योजनेचा संदर्भ देताना नायडू म्हणाले, मुळा-मुठा हे काय नाव आहे काय ? बॉम्बेचे नामकरण मुंबई केलं तसचं काहीतरी करा. नायडू यांनी अचानकपणे नदीचे नामकरणाची मागणी केल्याने पत्रकारही बुचकाळ्यात पडले. सध्या महापालिका निवडणूकीच्या प्रचाराची धामधुम सुरु आहे. राजकीय वातावरण तापले असताना नायडू यांनी मुळा – मुठेचे नाव बदलून नवे नामकरण करण्याची भुमिका मांडल्याने भाजप विरोधकांना प्रचाराचे आयते कोलित मिळाले आहे.
पुणेकरांचे मुळा – मुठेशी शेकडो वर्षाचे नाते आणि इतिहास आहे. या नद्यांचे नाव बदलाच्या मागणीने पुणेकरांचा स्वाभिमान दुखावला जाण्याची शक्यत आहे. त्यांच्या नामकरणाच्या भुमिकेमुळे पुण्यातील भाजपचे नेते मात्र अडचणीत आले आहेत.