जाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास पाठिंबा, विहिंपची काँग्रेसला ऑफर

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राम मंदिराच्या प्रश्नावर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी काँग्रेसला दिलेली ऑफर चर्चेचा विषय बनली आहे. ‘तुमच्या लोकसभा निवडणूकीच्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केल्यास, आम्ही पाठिंबा देण्याबाबत विचार करू’ अशाप्रकारचे विधान केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

आलोक कुमार म्हणाले की, ”राम मंदिरासाठी ज्यांनी खुलेपणाने आश्वासन दिले होते, त्यांना पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला, तर आम्ही काँग्रेला पाठिंबा देण्याबाबत विचार करू. तसेच आरएसएच्या स्वयंसेवकांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावर घातलेली बंदीही त्यांनी मागे घ्यावी. नूसते जानवे घालून हे होणार नाही.” त्यामुळे एेन कुंभमेळ्यादरम्यान काँग्रेसला ऑफर देऊन विश्व हिंदू परिषदेने मोदी सरकारला इशारा दिला आहे.

विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलेले हे वक्तव्य भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. पुर्ण बहुमताचे सरकार असूनही भाजपला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढता आलेला नाही त्यामुळे विश्व हिंदू परिषदेसह इतर हिंदूत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.