व्हिडीओ: …आणि पाहता पाहता मुंगीने चोरला हिरा!

सामना ऑनलाईन । मुंबई

बातमीचं शीर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना..? कसं शक्य आहे हे..? एवढीशी मुंगी हिरा कसा काय चोरेल..? या आणि अशा प्रश्नाचं उत्तर एकच आहे.. हो. हे खरं आहे.एका मुंगीने हिरा चोरल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये एक मुंगी आपल्या पुढच्या पायांनी एक हिरा ढकलत नेत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ न्यूयॉर्क पोस्टने व्हायरल केला असून हा नेमका कुठल्या जागेचा व्हिडीओ आहे, हे मात्र समजू शकलेलं नाही. पण, हा व्हिडीओ सूरत येथील एका सराफाच्या दुकानातील असल्याची चर्चा आहे. व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीने धमाल उडवून दिली आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याच्या मते ही मुंगी आता कोट्यधीश झालेली आहे, तर दुसऱ्या नेटकऱ्याच्या मते आता तो मुंग्यांवरही विश्वास ठेवू शकत नाही. काही जणांनी आता हिरा चोरून मुंग्यांवर आरोप करता येईल, असं म्हटलं आहे. तर काहींनी ही मुंगी पुरुष असून आपल्या प्रेयसीसाठी हिऱ्याची अंगठी बनवण्यासाठी हिरा चोरत असल्याचं म्हटलं आहे.

summary- video ant dragging diamond