दीपिकाने रणवीरला बॅटने धुतलं… पाहा हा धम्माल व्हिडीओ

61
सामना ऑनलाईन । लंडन
 
सध्या रणवीर सिंह 1983 च्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित आगामी  ’83’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रणवीरची खऱ्या आयुष्यातील पत्नी दीपिका पदुकोन त्याच्या पत्नीच्य़ा भूमिकेत दिसणार आहे. ’83’ या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे सध्या लंडन येथे शूटींग सुरू असून नुकतंच दीपिका देखील लंडनला गेली आहे. रणवीरने त्याच्या ट्विटर अकाऊंट वर दीपिका सोबतचा एक फन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये दीपिका रणवीरला बॅटने धुताना दिसून येत आहे. सोबतच त्याने ‘स्टोरी ऑफ माय लाईफ रिल अँड रिअल’ अशी मिश्कील कॅप्शन देखील दिली आहे.

’83’ या चित्रपटात रणवीर 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या हिंदुस्थानी संघाचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारात आहे. या चित्रपटात दीपिका ही कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारात आहे.
आपली प्रतिक्रिया द्या