हस्तमैथुन करणाऱ्याला विद्या बालनने चोपले

सामना ऑनलाईन । मुंबई

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध, विशेषतः लैंगिक अत्याचारांविषयी तमाम अभिनेत्री आता मोकळेपणाने भाष्य करताहेत. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिनेही महाविद्यालयात घडलेला एक प्रसंग आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये तिने सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिकत असताना रेल्वे प्रवास करतेवेळी घडलेला प्रसंग विद्याने सांगितला.

आम्ही तीन मैत्रिणी होतो. आम्ही लोकलमध्ये महिलांच्या डब्यात बसलो होतो. त्यावेळी एक मुलगा आमच्या डब्यात चढला. तो आमच्या समोरच येऊन बसला. हा लेडीज डबा असल्याचं त्याला सांगितलं. तेंव्हा ‘ओह, हा लेडीज डबा आहे का? ठिक आहे, पुढच्या स्टेशनला मी उतरून जातो’, असं म्हणंत तो दरवाजात जाऊन उभा राहिला. त्यानंतर पुढचं स्टेशन आलं आणि ट्रेन सुरू झाली. आम्हाला वाटलं तो उतरला असेल. पण तो उतरला नव्हता. ट्रेन सुरू झाल्यानंतर तो खिडकीजवळ येऊन बसला. त्यावेळी काही तरी गडबड असल्याची कल्पना मला आली होती आणि तसेच झाले. त्याने अचानक पँटची जीप काढली आणि आमच्या समोरच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. माझ्या हातात पेपर पॅड किंवा फाइल सारखं काही तरी होतं. त्यानेच मी त्याला मारायला सुरुवात केली, असं विद्याने सांगितलं.

मी त्याला मारहाण करतानाच त्याला भरपूर शिव्या घातल्या. त्याला खेचतच गेटपर्यंत घेऊन गेले आणि त्याला मी खरोखरच ट्रेनमधून ढकलून दिलं. नशीब तेवढ्यात स्टेशन आलं होतं. म्हणून तो वाचला. नाही तर त्याच दिवशी तो मेला असता, असंही तिनं सांगितलं. ‘तुम्हारी सुलू’ हा विद्याचा नवा चित्रपट येत आहे. त्यात तिने रेडिओ जॉकीची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नेहा धुपियाच्या शोमध्ये आली असता तिने हा प्रसंग सांगितला.