मर्यादा ओलांडणाऱ्या फॅनमुळे विद्या बालनला मनस्ताप

सामना ऑनलाईन,मुंबई

बॉलीवूडमधील कलाकारांच्या जवळ जाण्यासाठी, त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी काही जण वाट्टेल त्या थराला जायला तयार असतात. याचा फटका अभिनेत्री विद्या बालनला देखील बसला होता. तिने ही घटना एका कार्यक्रमात विस्ताराने सांगितलं.

विद्या म्हणाली की सिद्धीविनायक मंदिरात ती दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेऊन तिने डोळे बंद केले तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला, संतापलेल्या विद्याने डोळे उघडले आणि बघतिलं तर एक माणूस होता, त्या माणसाने तिला सांगितलं की माझ्या बायकोला तुमच्यासोबत फोटो काढायचाय, रागावर नियंत्रण ठेवत थोड्यावेळाने बघू म्हणून सांगितलं आणि नंतर पुन्हा डोळे मिटून घेतले, तर त्या माणसाने पुन्हा खांद्यावर हात ठेवला आणि फोटोची विनंती केली. यावर संतापलेल्या विद्याने त्याला चांलगंलच फैलावर घेतलं.  ‘आम्ही सेलिब्रिटी आहोत म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी नाही’ असं विद्या बालनने यावेळी सांगितलं.