‘एनटीआर’च्या पत्नीच्या भूमिकेत विद्या बालन

अभिनेते, नेते एन.टी.रामा राव यांच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन झळकणार आहे. या चित्रपटात ती राव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. विद्याचा हा पहिलाच तेलगू चित्रपट असून तेलगू भाषेतून संवाद साधण्यासाठी उत्सुक असल्याचे ती म्हणाली. शूटिंग सुरू होऊन पाच दिवस उलटले असून सकाळी ९ वाजता शूटिंग सुरू होते आणि संध्याकाळी सहा वाजता संपते. हा अनुभव खास असल्याचेही विद्याने सांगितले.