विजय मल्ल्याच्या घरावर कोर्टाची टाच येणार

1
विजय मल्ल्या दर आठवड्याला मिळून 16 लाख रूपये खर्च करतो

सामना ऑनलाईन । लंडन

बँकाना हजारो कोटींच्या कर्जाचा चुना लावणाऱ्या कर्जबुडव्या मल्ल्याच्या लंडनमधील घरावर टाच येण्याची शक्यता आहे. सरकारी बँकांप्रमाणेच मल्ल्याने स्विस बँकेकडेही घर गहाण ठेवून कर्ज घेतल्याचं समोर येत आहे. मात्र, कर्जाचे हप्ते न भरल्याने स्विस बँकेने त्याच्या घरावर जप्ती आणण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थानातून फरार झाल्यानंतर मल्ल्या लंडनमध्ये लपून बसला आहे. त्याने तिथल्या रेजन्ट पार्क येथील आपल्या आलिशान घरावर UBS AG या स्विस बँकेकडून सुमारे 2.4 कोटी पाउंड म्हणजे 195 कोटी रुपये इतकं कर्ज घेतलं होतं. मात्र, मल्ल्याने आजतागायत कर्जाच्या परताव्याचा एकही हप्ता दिलेला नाही. त्यानंतर बँकेने त्याला घर सोडण्यासही सांगितलं होतं. मात्र, त्याने त्याला नकार दिला. त्यामुळे त्याच्या घरावर जप्ती आणण्यासाठी आता स्विस बँकेने कोर्टात धाव घेतली आहे.

या प्रकरणी लंडन कोर्टात विजय मल्ल्या, त्याची आई ललिता मल्ल्या आणि मुलगा सिद्धार्थ मल्ल्या या तिघांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.